

SAGAR KARANDE
ESAKAL
'फू बाई फू', 'चला हवा येऊ द्या' यांसारख्या गाजलेल्या कायक्रमातून प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा लोकप्रिय मराठमोळा कलाकार सागर कारंडे सध्या 'बिग बॉस मराठी ६' च्या घरात दिसतोय. घरात सागर टास्क खेळताना दिसतोय, नेटकरीही त्याचं कौतुक करतायत. त्याचं 'चला हवा येऊ द्या' मधील पोस्टमनचं पात्र कुणीही विसरू शकत नाही. मात्र गेले कित्येक दिवस सागर इंडस्ट्रीमधून गायब होता. तो कोणत्याही नव्या प्रोजेक्टमध्ये दिसत नव्हता. तो थेट 'बिग बॉस मराठी'च्या घरात दिसला. शो मध्ये जाण्यापूर्वी सागरने केलेल्या खुलाश्यामध्ये त्याच्या पाठीमागे कारस्थानं करण्यात आली असं म्हटलंय.