
Sajana Marathi Movie Review: प्रत्येकाचा जगण्याचा संघर्ष वेगळा असतो तो समपातळीवर कधीच नसतो. काहींचा संघर्ष तर केवळ जगण्यापुरताच नसतोच तर तो माणसानं निर्माण केलेल्या समाजमान्यता अन् भेदभावाचा असतो. या संघर्षांमध्ये प्रेमाचा विषय तर वेगळाच! एखाद्यावर नुसतं प्रेम जडणं इतका हा विषय नक्कीच सोपा नसतो. तर त्यात समरुप होणं, विरघळून जाणं आणि त्यागाचा अंशही असावा लागतो. पण तरीही निसर्गाकडं मनातल्या आणि भावनेतल्या नजरेनं तुम्ही पाहिलतं तर त्यातले रंग तुमचं अस्तित्व राखण्याची प्रेरणा देतात.