सलमानचा चर्चेत असलेल्या 'सिकंदर' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या वर्षी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. तेव्हापासून चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली होती. दरम्यान या चित्रपटातील एक नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्यात सलमान आणि रश्मिका यांची केमिस्ट्री पहायला मिळाली आहे.