Salman Khan: सलमानसोबत लग्नाचा हट्ट, 24 वर्षांची मुलगी पोहोचली पनवेलमधील फार्म हाऊसवर, पोलिसांनी थेट...

Salman Khan Panvel Farmhouse: एक 24 वर्षांची मुलगी पनवेलच्या फार्महाऊसच्या बाहेर जाऊन सलमानसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती.
सलमानसोबत लग्नाचा हट्ट, 24 वर्षांची मुलगी पोहोचली पनवेलमधील फार्म हाऊसवर, पोलिसांनी थेट...
Salman Khansakal

Salman Khan: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानचा (Salman Khan) चाहता वर्ग मोठा आहे. सलमान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमधील घरावर गोळीबार झाला होता. तेव्हापासूनच सलमानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली. अशातच आता सलमानच्या पनवेल (Panvel) येथील फार्म हाऊसच्या बाहेर एका मुलीनं गोंधळ घातला आहे. ही 24 वर्षांची मुलगी पनवेलच्या फार्महाऊसच्या बाहेर जाऊन सलमानसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती.

मुलीला पोलिसांनी घेतलं ताब्यात

पनवेलमध्ये सलमान खानचे भव्य फार्म हाऊस आहे.सलमान अनेकदा त्याच्या फार्म हाऊसमध्ये वेळ घालवत असतो. आता दिल्लीमधील एका मुलीने फार्म हाऊसच्या बाहेर पोहोचून चांगलाच गोंधळ घातला. ही मुलगी पनवेलमधील फार्म हाऊसच्या बाहेर आली होती, ती सलमानसोबत लग्न करण्याचा हट्ट करत होती. अशातच या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पोलिसांनी त्या मुलीला NGO कडे काऊन्सीलिंगसाठी पाठवले. त्या एनजीओच्या संस्थापकाने सांगितले की,"त्या मुलीला पोलिसांनी आमच्याकडे आणले. आम्हाला तिची प्रकृती खूपच गंभीर वाटली, कारण तिने आमचे म्हणणे ऐकून घेण्यास नकार दिला आणि तिला सलमान खानशी लग्न करायचे होते. ती सलमान खानच्या स्क्रीन इमेजच्या प्रेमात पडली होती."

सलमानसोबत लग्नाचा हट्ट, 24 वर्षांची मुलगी पोहोचली पनवेलमधील फार्म हाऊसवर, पोलिसांनी थेट...
Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

त्या मुलीनं NGO ला सांगितलं, "मी लहानपणापासून सलमानचे चित्रपट पाहत आहे. मी सलमानसोबत लग्न करु शकते, असा निरागस विचार मी केला होता . आता पनवेलला येऊन हे सर्व झाल्यावर माझी चूक झाली, हे मला लक्षात आले आहे. सलमान त्याचे आयुष्य जगत आहे आणि तो चित्रपटात आहे तसा नाहीये."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com