Salman Khan Opens Up on Trigeminal Neuralgia:
esakal
बॉलिवूडचा स्टार अभिनेता सलमान खान याचे लाखो चाहते आहेत. त्याची बॉडी वगैरे पाहून हा अजूनही इतका तंदुरुस्त कसा दिसतो असा प्रश्न चाहत्यांना पडतो. परंतु तुम्हाला माहितीय का? बॉलिवूडचा भाईजान याला मोठा आजार झाला होता. या आजारामध्ये त्याचे जवळपास सात ते आठ वर्ष गेली होती. सलमानने सात वर्ष कंरट लागल्यासारखं दुखणं सहन केलय. नाष्टा तसंच ब्रश करणं सुद्धा त्याला त्रास द्यायचं. परंतु हे सगळं घडलं कसं तर चेहऱ्यावरील एक केस काढण्याचं निमित्त झालं आणि भाईजानला स्वत:चा जीव संपण्यासारखा आजार झाला. याला सुसाईड डिजीज सुद्धा म्हणतात.