Salman Khan Reveals Desire to Become Father at 59
esakal
अभिनेता सलमान खानने आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले. एक काळ असा होता जेव्हा सलमान खानचा प्रत्येक चित्रपट हिट होत होता. सलमान खानने त्याच्या करिअरमध्ये भरपूर यश मिळवलंय. परंतु वयक्तिक आयुष्यामध्ये मात्र तो मागे राहिला. भाईजान आज देखील सिंगल आहे. सलमान खानचे अनेक अफेअर्स झाले. परंतु एक सुद्धा लग्नापर्यंत गेलं नाही. दरम्यान अशातच आता सलमानने एका शोमध्ये उपस्थिती लावली होती. यावेळी त्याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल आणि मनातील असलेल्या भावना मनमोकळेपणाने मांडल्या आहेत.