Samay Raina: ‘इंडियाज गॉट लेटेंट २’वर पुन्हा वाद! काश्मिरी पंडित-बिहाऱ्यांवरील विनोद समय रैनाला भोवणार; भाजपकडून कारवाईची मागणी

Samay Raina Show Sparks Row: कॉमेडियन समय रैना 'इंडियाज गॉट टॅलेंट'च्या आणखी एका भागामुळे पुन्हा एकदा वादात सापडला आहे. रैनाच्या शोमधील बिहारी आणि काश्मिरी पंडितांवरील विनोदांमुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे.
Fresh Controversy Around Samay Raina’s Show; BJP Demands Action Over Alleged Remarks

Fresh Controversy Around Samay Raina’s Show; BJP Demands Action Over Alleged Remarks

ESakal

Updated on

कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्या 'इंडियाज गॉट लेटंट २' या शोच्या ताज्या एपिसोडमध्ये काश्मिरी पंडित आणि बिहारी लोकांबद्दल केलेल्या कथित विनोदामुळे वाद निर्माण झाला आहे. भाजप आमदार राम कदम यांनी समय रैनाच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला असून हा काश्मिरी पंडित समाजाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काश्मिरी पंडितांविरुद्ध अपमानास्पद भाषेचा वापर अस्वीकार्य आहे, असे ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com