Satish Shah’s Last Message to Sachin Pilgaonkar Before His Death Will Leave You Emotional
esakal
Premier
'12 वाजून 56 मिनिटांनी त्याचा मेसेज आला...' सतीश शाह यांचा निधनापूर्वी केलेला सचिन पिळगांवकरांना मॅसेज, म्हणाले...'सतीश आणि मी... '
Satish Shah’s Last Message to Sachin Pilgaonkar Before His Death Will Leave You Emotional: ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्व शोकाकुल आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर यांना रात्री १२:५६ वाजता शेवटचा मेसेज पाठवला होता. ‘गम्मत जंमत’पासून सुरू झालेली दोघांची मैत्री आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधनाने संपुर्ण मनोरंजन विश्व शोकाकुल आहे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्याची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु मूत्रपिंड निकामी झाल्यानं त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी 25 ऑक्टोबरला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सतीश शाह यांनी त्यांच्या अभिनय क्षेत्रान अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
