SHABANA AZMI SAYS I AM MUSLIM BUT DON'T OFFER NAMAZ
esakal
JAVED AKHTAR IS A HARDCORE ATHEIST SAYS SHABANA AZMI: बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक वेळा ते धर्माबद्दल असलेले त्यांचे विचार मांडत असतात. अशातच आता एका मुलाखतीत शबाना आझमी यांनी आपल्या बालपणीच्या धार्मिक वातावरणाबद्दल आणि त्यांच्या श्रद्धेबद्दल मत व्यक्त केलय. यावेळी त्यांनी 'मी मुस्लिम आहे, पण नमाज पढत नाही' असं सांगितलं. त्याच्या या वक्तव्याची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहे.