Shah Rukh Khan: शाहरुखचं लेकचं लेकीवर जिवापाड प्रेम; सुहानाच्या 'किंग' साठी करतोय कोट्यवधींचा खर्च

Shah Rukh Khan: शाहरुखची लेक सुहाना सुद्धा बॉलिवूडमध्ये पदार्पण करतेय. सध्या या सिनेमाच्या शूटिंगची पूर्वतयारी सुरु असून हा सिनेमा उत्तम बनावा म्हणून सिनेमाची टीम जोरदार तयारी करत आहे.
Shah Rukh Khan
Shah Rukh Khanesakal

Shah Rukh Khan: ‘पठाण’(Pathaan), ‘जवान’ (Jawan) आणि ‘डंकी’ (Dunki) या सिनेमानंतर अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) ‘किंग’ या सिनेमातून पुन्हा एकदा एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २०२५ मध्ये रिलीज होणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन सुजॉय घोष करत आहेत. या सिनेमातून शाहरुखची लेक सुहाना सुद्धा मोठ्या स्क्रीनवर पदार्पण करतेय. सध्या या सिनेमाच्या शूटिंगची पूर्वतयारी सुरु असून हा सिनेमा उत्तम बनावा म्हणून सिनेमाची टीम जोरदार तयारी करत आहे.

हा अॅक्शन आणि ड्रामाने पुरेपूर असलेल्या या सिनेमाचं बजेट तब्बल २०० करोड रुपये आहेत. सिद्धार्थ आनंद आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘बॉलिवूड हंगामा’च्या च्या रिपोर्टनुसार,हा सिनेमा अॅक्शनने पुरेपूर भरलेला असून इंडस्ट्रीत एक अॅक्शनपटांसाठी एक वेगळं उदाहरण तयार प्रयत्न या सिनेमातून होणार आहे. सुहाना खान या सिनेमातून पदार्पण करणार आहे हे लक्षात घेऊन ही फिल्म भव्य आणि तितकीच उत्तम असेल असा प्रयत्न सिनेमाच्या टीमकडून करण्यात येतोय. लेकीच्या मोठ्या स्क्रीनवरील पदार्पणासाठी शाहरुख खूप जास्त मेहनत घेत असल्याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली आहे.

खास परदेशातील स्टंट दिग्दर्शक या सिनेमासाठी बोलावले असून उत्तम व्हीएफएक्स आणि आधुनिक तंत्रज्ञान या सिनेमासाठी वापरलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे. येत्या मे महिन्यात सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून पाच महिने या सिनेमाचं शूटिंग सुरु राहणार आहे. २०२५ च्या अखेरीस हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल असा अंदाज आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan On Ramcharan : शाहरुखनं केला रामचरणचा अपमान? 'त्या' उल्लेखामुळे नव्या वादाला सुरुवात, किंग खानचे चाहते उतरले मैदानात!

दरम्यान, या सिनेमाबाबत शाहरुख किंवा सुहानाने कोणतीही पोस्ट शेअर केली नाहीये. तसेच सिनेमाच्या टीमकडून सुद्धा याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये.

सुहानाने झोया अख्तर दिग्दर्शित ‘आर्चिज’ या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ओटीटीवर रिलीज झालेल्या सिनेमात ख़ुशी कपूर, अगस्त्य नंदा यांचीही मुख्य भूमिका होती. या सिनेमाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. काहींनी या सिनेमावर टीकासुद्धा केली होती. पहिल्या सिनेमातून प्रेक्षकांचं मन जिंकण्यात अयशस्वी ठरल्यानंतर सुहानाचा हा सिनेमा यशस्वी ठरणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com