बॉलिवूडच प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूर आणि करीना कपूर यांचा जब वी मेट चित्रपटाचे आज देखील प्रचंड चाहते आहेत. आज देखील तो चित्रपट तितक्याच आवडीने पाहिला जातो. इम्तियाज अली यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. शाहिद कपूर आणि करीनाचा हा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर दोघांनी कधीही एकत्र काम केलं नाही. या चित्रपटावेळीच दोघांचं ब्रेकअप झाल्याचं बोललं जातं.