ग्रँड फिनालेच्या आधी गेम फिरला; टॉप ५ मधून पहिलं एव्हिक्शन झालं, 'हा सदस्य झाला घराबाहेर?

GRAND-FINALE-SURPRISE-EVICTION: 'बिग बॉस मराठी ६'चा आज ग्रँड फिनाले आहे. त्याचं पहिलं एव्हिक्शन झालं आहे. जो विजेतेपदाचा स्ट्रॉंग कँडिडेट मानला जात होता तोच घराबाहेर झाला आहे असं प्रोमोमध्ये दिसतंय.
BIGG BOSS MARATHI 6 FIRST ELIMINATION

BIGG BOSS MARATHI 6 FIRST ELIMINATION

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील सगळ्यात लोकप्रिय कार्यक्रम ''बिग बॉस मराठी'चा आता सहावा सीझन सुरू होता. अखेर प्रेक्षक ज्याची वाट पाहत होते तो दिवस आलाय. आज १९ एप्रिल रोजी 'बिग बॉस मराठी ६'चा ग्रँड फिनाले होणार आहे. रात्री ८ वाजता ग्रँड फिनालेमध्ये या सीझनचा विजेता किंवा विजेती समजणार आहे. सध्या घरात फक्त ५ स्पर्धक उरलेत. टॉप 5 मध्ये अनुश्री माने, तन्वी कोलते, राकेश बापट, दिपाली सय्यद, विशाल कोटियन यांचा समावेश आहे. त्यामुळे नक्की जिंकणार कोण याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मात्र त्यापूर्वी कलर्स मराठीने शेअर केलेल्या एका प्रोमोमुळे चाहत्यांची झोप उडालीये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com