'ये सिर्फ कपड़ा नहीं, अभिमान है'; श्रद्धा कपूरच्या 'ईठा'चा ट्रेलर प्रदर्शित, विठाबाईंच्या भूमिकेतील लूक पाहून चाहते थक्क!

SHRADDHA KAPOOR AS VITHABAI NARAYANGAONKAR IN EETHA: श्रद्धा कपूरच्या आगामी 'ईठा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. विठाबाई नारायणगावकर यांच्या भूमिकेतील श्रद्धाचा नऊवारीतील मराठमोळा अंदाज आणि रणदीप हुड्डाचा लूक चर्चेत आहे. चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
SHRADDHA KAPOOR  IN EETHA

SHRADDHA KAPOOR IN EETHA

esakal

Updated on: 

EETHA TRAILER FEATURING SHRADDHA KAPOOR AND RANDEEP HOODA: आज दादरच्या प्लाझा सिनेमागृहात कलाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळाली. निमित्त होतं महाराष्ट्राची शान आणि लावणीसम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या आयुष्यावर आधारित 'ईठा' या आगामी चित्रपटाच्या ट्रेलर लाँचचं! ट्रेलर पाहण्यासाठी सकाळपासूनच मीडियाने प्लाझा सिनेमागृहाबाहेर गर्दी केली होती. मराठमोळ्या पथकाच्या गजरात आणि लावणीच्या ठेक्यावर चित्रपटातील कलाकारांनी कार्यक्रमस्थळी दमदार एन्ट्री केली. मात्र, सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या त्या ईठाकडे!

Loading content, please wait...