Siddharth Jadhav’s Fierce Look from Punah Shivajiraje Bhosale Goes Viral
esakal
महेश मांजरेकरने दिग्दर्शित केलेल्या 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचं एक नवं पोस्टर पुन्हा चर्चेत आलं आहे. या पोस्टरमुळे प्रेक्षकाची सिनेमा पाहण्याची उत्सुकता वाढली आहे. या पोस्टरमध्ये प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ जाधवचा लूक समोर आलाय. सिद्धार्थच्या वाढदिवसानिमित्त त्याचा चित्रपटातील लूक प्रसिद्ध करण्यात आला. सिद्धार्थ जाधवने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या परंतु हा त्याचा लूक पाहून प्रेक्षक चकित झालेत.