बॉलिवूडमधील प्रसिद्ध कपल सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी लवकरच आईबाबा होणार आहे. काही महिन्यापूर्वी दोघांनी चाहत्यांनी आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी दिली. सिद्धार्थ नेहमी कियाराची काळजी घेताना दिसतो. काही दिवसांपूर्वी कियाराचे फोटो काढणाऱ्या पपाराझीवरही सिद्धार्थ भडकला होता. दरम्यान कियारा आई होणार असल्याने सिद्धार्थने कियारासाठी एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे.