
Bollywood Entertainment News : बॉलिवूड गायक सोनू निगमचे अनेक चाहते आहेत. त्याच्या कॉन्सर्ट्सनाही खूप गर्दी असते. याबरोबरच सोनू त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही चर्चेत असतो.
दरम्यान सोनूने त्याच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. ज्यात तो त्याच्या तब्येतीविषयीचे अपडेट शेअर करतोय. एका लाईव्ह परफॉर्मन्स दरम्यान अचानक तब्येत बिघडल्याचं त्याने सांगितलं. खूप वेदना होत असतानाही त्याने परफॉर्मन्स सादर केला. काय घडलं नेमकं हे सोनूने व्हिडिओमधून सांगितलं.