पलाश मुच्छल स्मृतीला धोका देत होता? फ्लर्टी चॅट्स व्हायरल, लग्न मोडणार?

Palash Muchhal Cheat? Viral Flirty Chats: स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न पुढे ढकललं असतानाच सोशल मीडियावर पलाशच्या फ्लर्टी चॅट्सचे स्क्रीनशॉट्स व्हायरल झाले आहेत.
Palash Muchhal Cheat? Viral Flirty Chats

Palash Muchhal Cheat? Viral Flirty Chats

esakal

Updated on

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचं लग्न रद्द झालं. स्मृतीच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे लग्न पुढं ढकलण्यात आलय. पलाशची बहीण आणि स्मृतीचे व्यवस्थापक यांनी श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बरी झाल्यानंतरच लग्न होईल असं सांगितलंय. परंतु त्यांचं लग्न मोडल्यानंतर वेगवेगळे कारण समोर येत आहेत. सध्या सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चा रंगत आहे. पलाश स्मृतीला धोका देत असल्याचं बोललं जातय. काही चॅट्स व्हायरल झाल्यानंतर तो धोका देणारा पलाशच तर नाही ना? अशा चर्चा सोशल मीडियावर रंगत आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com