

sonakshi sinha
esakal
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्या घराचे सुंदर फोटो अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सोनाक्षी तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत असते. नुकतीच तिची वेबसीरिज 'सिस्टम' प्रेक्षकांच्या भेटीला आली. यातील तिच्या अभिनयाचंदेखील कौतुक होतंय. अभिनयासोबतच गुंतवणुकीच्या बाबतीतही सोनाक्षी सजग असते. आता रिअल इस्टेटच्या क्षेत्रात तिने एक मोठी डील केली आहे. सोनाक्षीने तिचं मुंबईतलं घर भाड्याने दिलंय. तेही कुणा भारतीयाला नाही तर थेट कुवेत देशाच्या दूतावासाला. या घराचं भाडं वाचून तुमच्याही भुवया उंचावतील.