

LAGNANANTAR HOILCH PREM
ESAKAL
Lagnanantar Hoilach Prem Serial: स्टार प्रवाहवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' ही मालिका काही महिन्यांपूर्वी टीआरपी यादीत टॉप ३ मध्ये होती. मात्र आता या मालिकेची माती केल्याची भावना नेटकरी व्यक्त करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत काव्या आणि नंदिनी यांचा प्रेग्नन्सीचा भाग सुरू आहे. त्यातही काव्या अगोदर गरोदर होते. मात्र नंदिनी हिट नाही. त्यानंतर जेव्हा नंदिनी गरोदर राहते तेव्हा तिचं मिसकॅरेज होतं आणि तिचं बाळ दगावतं. हे कमी म्हणून नंदिनी आता आई होऊ शकत नाही. मात्र आता मालिकेत भलताच ट्विस्ट आला आहे. नंदिनीच्या बाळाला जन्म देण्यासाठी जीवा दुसऱ्याच मुलीला घरी घेऊन येणार आहे.