कसलं भारी! सुबोध आणि तेजश्रीचा धमाल डान्स पाहून नेटकरी खुश; वृद्धाश्रम वाचवायला होणार त्याची झक्कास एंट्री!

SUBODH BHAVE TEJASHRI PRADHAN DANCE : लवकरच 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये एक झक्कास गाणं दाखवण्यात येणार आहे. ज्याचा प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झालेत.
TEJASHRI SUBODH DANCE

TEJASHRI SUBODH DANCE

ESAKAL

Updated on

'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत येत्या आठवड्यात प्रेक्षकांना रोमँटिक क्षण आणि मनोरंजक वळणांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. कुटुंबातील तणाव, गैरसमज आणि नात्यांच्या गुंतागुंती मधून कथा पुढे सरकत असताना, एक विशेष ट्रॅक येणार आहे. स्वानंदी आणि समर आश्रमात वृक्षारोपण उपक्रम आयोजित करतात. अनेक अडचणी, अडथळे आणि विरोध असूनही, ते हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करतात. काही लोक या उपक्रमात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात, परंतु समर ठामपणे उभा राहून सर्व परिस्थिती हाताळतो.या मालिकेचा नवा प्रोमो प्रदर्शित झालाय. जो पाहून प्रेक्षक खुश झालेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com