Sunny Leone Birthday: मुंबईत आलिशान घर अन् लग्झरी गाड्यांचे कलेक्शन; बॉलिवूडची बेबी डॉल आहे कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या संपत्तीबाबत...

Sunny Leone wealth: जाणून घेऊयात सनीच्या संपत्तीबाबत आणि तिच्या कार कलेक्शनबाबत...
Sunny Leone Birthday
Sunny Leone Birthdaysakal

Sunny Leone Birthday: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनीचा (Sunny Leone) चाहता वर्ग मोठा आहे.सनी अनेक चित्रपटांमधील आयटम साँग्समध्ये झळकली आहे. आज सनीचा 43 वा वाढदिवस आहे. अनेकजण तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. सनीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल तिच्या चाहत्यांना जाणून घ्यायचे असते. सनीकडे किती संपत्ती आहे? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असेल. जाणून घेऊयात सनीच्या संपत्तीबाबत आणि तिच्या कार कलेक्शनबाबत...

सनी लिओनीनं तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात पॉर्न स्टार म्हणून काम केलं. त्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली.सनीचा कमाईचा मुख्य स्त्रोत म्हणजे तिचे चित्रपट रिपोर्ट्सनुसार, सनी ही एका चित्रपटात काम करण्यासाठी 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते. यासोबतच ती काही ब्रँड्सची जाहिरात देखील करते. याशिवाय तिचे सनसिटी मीडिया अँड एंटरटेनमेंट नावाचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे, ज्याचा ती सह-मालक आहे. रिपोर्टनुसार, सनी लिओनीची एकूण संपत्ती जवळपास 100 कोटी रुपये आहे.

सनीचं मुंबईत आलिशान घर

सनी लिओनच मुंबईत एक आलिशान घर आहे. या घराशिवाय तिचा लॉस एंजेलिसमध्ये एक आलिशान बंगलाही आहे. तिच्या या बंगल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Sunny Leone Birthday
Sunny Leone: सनी लिओनीचा 'जबरा फॅन'; हातावर काढला टॅटू, व्हिडीओ शेअर करुन बेबी डॉल म्हणाली...

सनीचं कार कलेक्शन

सनी लिओनीकडेही अनेक आलिशान गाड्यांचे कलेक्शन देखील आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये BMW 7, Audi A6 आणि Mercedes GL350D सारख्या अनेक कार आहेत.

2012 मध्ये रिलीज झालेल्या जिस्म-2 या चित्रपटातून सनीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'बेबी डॉल','सैयां सुपरस्टार', 'चार बोतल वोडका' आणि 'ट्रिपी ट्रिपी' या सनीच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. रागिनी एमएसएस 2, कुछ कुछ लोचा है, वन नाइट स्टँड, ओ माई घोस्ट, बेईमान लव, एक पहेली लीला या चित्रपटांमध्ये सनीनं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com