Surya Double Role: साऊथ सुपरस्टार सूर्या साकारणार डबल रोल, पोस्टरची होतेय चर्चा

Surya Double Role: साऊथ सुपरस्टार सूर्या साकारणार डबल रोल, पोस्टरची होतेय चर्चा

हा पोस्टर पाहून चाहते खुश झाले आणि सोशल मीडियावर त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केल |Fans were delighted to see the poster and took to social media to express their joy

Surya Double Role: साऊथ सुपरस्टार सूर्या लवकरच नव्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. सूर्या कंगुवा या सिनेमात काम करत असून नुकतंच त्याने सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत त्याचा सिनेमातील लूक रिव्हील केला.

X आणि इन्स्टाग्राम या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर त्याने त्याचं लूक पोस्टर शेअर करत तो या सिनेमात डबल रोल करत असल्याचं जाहीर केलं. त्याचा हा पोस्टर पाहून चाहते खुश झाले आणि सोशल मीडियावर त्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला.

या पोस्टरमध्ये सूर्याचे दोन पूर्णपणे वेगळे लूक पाहायला मिळत आहेत. पोस्टरमध्ये दिसणारा एक लूक आधीच टीझरमध्ये रिव्हील करण्यात आला होता. ड्रेडलॉक्स हेअरस्टाईल, लढाऊ पोशाख आणि हातात तलवार या त्याच्या लुकने आधीच सगळ्यांची मनं जिंकली होती आणि आता दुसऱ्या लुकनेही सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

स्लीक हेअरस्टाईल, स्टायलिश सूट आणि हातात गन या लुकला सुद्धा प्रेक्षकांची पसंती मिळतेय. एकूणच या पोस्टरवरून दोन वेगवेगळ्या काळातील गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार असल्याचा अंदाज येतोय. 2024 मध्ये हा सिनेमा रिलीज होणार असून अजून या सिनेमाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली नाहीये.

या सिनेमातून दिशा पटनी आणि बॉबी देओल साऊथ इंडियन सिनेमात पदार्पण करत आहेत. या सिनेमात बॉबी देओल निगेटिव्ह भूमिका साकारणार असून या सिनेमात भरपूर अँक्शन आणि ड्रामा पाहायला मिळेल हे टीझर आणि पोस्टरवरून समजतंय.

हा सिनेमा थ्री डी मध्ये आणि दहा भाषांमध्ये रिलीज होणार आहे. दिग्दर्शक शिवा हा सिनेमा रिलीज करणार आहे. स्टुडिओ ग्रीन आणि यूव्ही क्रिएशन्स या सिनेमाची निर्मिती करत आहेत.

Surya Double Role: साऊथ सुपरस्टार सूर्या साकारणार डबल रोल, पोस्टरची होतेय चर्चा
Badaun Double Murder Case: 'पत्नी आजारी आहे, 5000 रुपये द्या', आरोपीने मुलांच्या आईकडे मागितली होती मदत; बदायूं हत्याकांडात नवीन अपडेट समोर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com