अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा मोठा चाहतावर्ग होता. आज देखील त्याचा तितकाच मोठा चाहतावर्ग आहे. त्याने आयुष्य संपवल्यानंतर अनेकांना धक्का बसला होता. अनेकांना त्याच्या जाण्याने दु:ख झालं होतं. सुशांतने कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:च्या कलेच्या जोरावर सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. त्याने त्याच्या संघर्षाच्या काळात अनेक छोटेमोठे रोल केले. बॅकग्राऊंड डान्सर म्हणून त्याने सुरुवातीला काम केलं.