Taapsee Pannu: पंजाबी गाण्यावर एंट्री अन् बहिणीसोबतचा भन्नाट डान्स; थाटात पार पडलं तापसीचं सिक्रेट वेडिंग, पाहा व्हिडीओ

Taapsee Pannu: तापसीने उदयपूरमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोशी लग्नगाठ बांधली.
थाटात पार पडलं तापसीचं सिक्रेट वेडिंग
Taapsee Pannuesakal

Taapsee Pannu: बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा लगीनसराई सुरु झालीये. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक सेलिब्रिटीज लग्नबंधनात अडकले आणि काही दिवसांपासून अभिनेत्री तापसी पन्नूने (Taapsee Pannu) लग्न केल्याची चर्चा सगळीकडे होती. पण याबाबत तापसीने कोणत्याही प्रकारचं भाष्य अजून केलं नाहीये. तिच्या या सिक्रेट वेडिंगबाबत सगळीकडे साशंकता असताना तिच्या लग्नसभारंभातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिचं लग्न झाल्याचं अखेर स्पष्ट झालं.

तापसीने उदयपूरमध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्र-मंडळींच्या उपस्थितीत तिचा बॉयफ्रेंड मॅथियस बोशी लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नसमारंभतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तापसी लाल रंगाच्या वधूच्या पोशाखात नाचत नाचत एंट्री घेतली. लाल रंगाचा पंजाबी सूट, केसांची घातलेली स्टायलिश वेणी, दोन्ही हातात भरलेला लाल चुडा, डोळ्यांवर सनग्लासेस अशा भन्नाट लूकमध्ये तापसी सुंदर दिसत होती.

पंजाबी गाण्यावर भन्नाट डान्स करत करत तापसीने लग्नसमारंभात एंट्री घेतली. तर मॅथियसने देखील पारंपरिक पंजाबी लूक केला होता. पगडी, शेरवानी या लूकमध्ये तो नटला होता. स्टेजवर चढताच तापसीने मॅथियसला मिठी मारली. त्यानंतर त्यांचा वरमालाचा विधी थाटात पार पडला. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच गाजतोय. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स कर तापसीचं अभिनंदन केलं.

पाहा व्हिडीओ:

या बरोबरच तापसीचा संगीत सभारंभसुद्धा थाटात पार पडला. संगीतला तापसी आणि तिची धाकटी बहीण शगुनने 'दिल ले गयी ले गयी' या गाण्यावर भन्नाट डान्स केला. तापसीने यावेळी सिल्व्हर रंगाचा ड्रेस घातला होता तर तिची बहीण शगुन आकाशी रंगाच्या लेहेंग्यात सुंदर दिसत होती. त्यांच्या या डान्सला उपस्थितांकडून कमालीची दाद मिळाली.

सोशल मीडियावर जरी तापसीच्या लग्नाचे व्हिडीओज व्हायरल झाले असले तरी अजूनतरी तिने स्वतःहून लग्नाचं स्पष्टीकरण दिल नाहीये. त्यामुळे तिचे चाहते तिच्या अधिकृत घोषणेची वाट पाहत आहेत आणि तिच्या लग्नाचे फोटोज पाहण्यास उत्सुक आहेत.

थाटात पार पडलं तापसीचं सिक्रेट वेडिंग
Taapsee Pannu Wedding: तापसीने बॅडमिंटनपटू बॉयफ्रेंडसोबत गुपचूप उरकलं लग्न! 'या' सेलिब्रेटींनी उदयपूरमध्ये लावली हजेरी

तापसीचा नवरा मॅथियस हा माजी बॅडमिंटन प्लेयर असून गेली दहा वर्षं ते एकमेकांना डेट करत आहेत. सध्या तो भारताच्या राष्ट्रीय बॅडमिंटन टीमचा प्रशिक्षक म्हणून काम करतोय. सूत्रांच्या माहितीनुसार २३ मार्च २०२४ला तापसी आणि मॅथियस लग्नबंधनात अडकले. त्यांच्या लग्नाला अनुराग कश्यप आणि कनिका ढिल्लों उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com