MAYUR VAKANI EMOTIONAL VIDEO
esakal
SUNDARLAL AKA MAYUR VAKANI VIRAL VIDEO: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय कॉमेडी मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. जेठालाल, भिडे, बिबिता तसंच सुंदरलालला सुद्धा प्रेक्षक आवडीने पाहतात. सुंदरलालची भूमिका अभिनेते मयूर वकानी साकारत आहे. जेठालाल आणि सुंदरलाल यांच्यातील कॉमेडी भांडणं प्रेक्षकांना खळखळून हसवतात. परंतु नेहमी हसवणारा सुंदरलाल सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आलाय. सोशल मीडियावर त्याचा ढसाढसा रडतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.