तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील रोशन सिंह सोढी आपल्या तब्येतीवरून खूप चर्चेत आहे. 7 जानेवारी रोजी त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत तब्येत अत्यंत खराब असल्याची माहिती दिली होती. तसंच कारण नंतर सविस्तर सांगतो असं ते व्हिडिओमध्ये म्हणाले होते. दरम्यान त्यांच्या एक जवळच्या मित्राने आता माहिती दिली आहे की, गुरुचरण यांनी आता अन्न-पाणी सोडले असून त्यांची तब्येत अत्यंत नाजूक आहे.