तेजश्री प्रधानचा 61 वर्षीय अभिनेत्यासोबत रोमान्स, लंडनच्या गुलाबी थंडीतील व्हिडिओ, ट्रेलर चर्चेत

‘Asa Mi Ashi Mi’ Trailer: ‘असा मी अशी मी’ या आगामी मराठी सिनेमाच्या ट्रेलरने सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तेजश्री प्रधान आणि ६१ वर्षीय अजिंक्य देव यांची अनोखी केमिस्ट्री, लंडनचे भव्य लोकेशन्स आणि वयाच्या अंतरावर आधारित प्रेमकथा प्रेक्षकांना भुरळ घालते आहे.
‘Asa Mi Ashi Mi’ Trailer

‘Asa Mi Ashi Mi’ Trailer

esakal

Updated on

मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील समर आणि स्वानंदी प्रेक्षकांच्या घरातील एक भाग झाले आहेत. तेजश्री तिच्या अभिनयाच्या करिअरबरोबरच वयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत असते. अशातच आता तेजश्रीला एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमामध्ये तिने 61 वर्षीय अभिनेता अजिंक्य देवसोबत रोमॅन्स केलेलं पहायला मिळतय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com