Rajendra Prasad with his daughterEsakal
Premier
Rajendra Kumar : साऊथ इंडस्ट्रीमधील दिग्गज अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर ! लाडक्या लेकीने घेतला अखेरचा श्वास
Actor Rajendra Prasad's Daughter Gayatri Passes Away : साऊथ इंडस्ट्रीमधील ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या मुलीने अखेरचा श्वास घेतला. यामुळे राजेंद्र प्रसाद यांना आणि त्यांच्या कुटूंबाला धक्का बसला आहे.
Entertainment News : तेलुगू सिनेविश्वातील ज्येष्ठ अभिनेते राजेंद्र प्रसाद यांच्या कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. राजेंद्र प्रसाद यांची मुलगी गायत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झालं. मृत्यूसमयी तिचं वय 38 वर्षं होतं. या घटनेमुळे संपूर्ण कुटूंबाला खूप मोठा धक्का बसला आहे.