halapathy Vijay’s Chennai Home Gets Bomb Threat
ESAKAL
Vijay Thalapathy: तामिळनाडूचे सुपरस्टार आणि राजकीय नेता थलपति विजयच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आलीय. TVKचे प्रमुख थलपति विजय यांना केंद्र सरकारने Y+ सुरक्षा दिली आहे. परंतु चेन्नईच्या नीलांकराई इथल्या कपालीश्वर नगर स्थित त्याच्या घरावर बॉम्ब टाकण्याची धमकी देण्यात आली. ही धमकी ऐकताच एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर सुद्धा ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.