THARLA TAR MAG STAR AMIT BHANUSHALI DANCES VIRAL VIDEO
ESAKAL
ठरलं तर मग मालिका गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. गेल्या ३ वर्षापासून ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. या मालिकेतील पात्र सध्या प्रेक्षकांच्या घरातील भाग झाले आहेत. सायली आणि अर्जुनची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. अशातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. मालिकेतील अर्जुन म्हणजेच अमित भानुषालीने बॉलिवूडमधील 23 वर्ष जुन्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय. सध्या त्याच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.