

Tiger Shroff
Esakal
मुंबईत जुहू परिसरात बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबाराच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांकडून अचानक गोळीबार करण्यात आला. यात सुदैवाने टायगर श्रॉफला गोळी लागलेली नाही. मात्र टायगरचा ड्रायव्हर आणि एक रिक्षावाला यात जखमी झाले आहेत. या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर गोंधळ उडाला असतानाच टायगर श्रॉफने प्रसंगावधान राखत जखमी ड्रायव्हरला स्वत: कार चालवत रुग्णालयात नेलं.