DIVYANKA TRIPATHI BUILDING FIRE
esakal
मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी हिच्यासोबत एक धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या आदल्या रात्री दिव्यांका राहत असलेल्या इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत दिव्यांका आणि तिचं कुटुंब थोडक्यात बचावलं. परंतु या आगीत इमारतीमधील एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झालाय. दिव्यांकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत नेमकं काय घडलं? याबाबत माहिती दिली आहे.