
स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा प्रसिद्ध शो 'इंडियाज गॉट लेटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. उर्फी जावेद त्यांच्या शोमध्ये पाहुणी म्हणून आली होती. पण दोन स्पर्धकांकडून अपमानास्पद टिप्पणी ऐकून अभिनेत्रीने सेट सोडला. सेटवर तिचा अपमान करण्यात आला. त्यानंतर ती सेट सोडून निघून गेली. आता तिने सेटवर नेमकं काय घडलं हे सांगून इन्स्टाग्रामवर आपला राग व्यक्त केला आहे. तुम्ही जे बोललात ते मुळीच सहन करण्यासारखं नव्हतं असं ती म्हणालीये.