Marathi Actor Vaibhav Mangle Defends Viral KBC Contestant Ishit Bhatt Amid Massive Trolling
esakal
सध्या सगळीकडे ज्युनिअर कौन बनेगा करोडपतीची चर्चा सुरु आहे. या शोमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिग बींसमोर हॉट सीटवर एक मुलगा बसलेला पहायला मिळतोय. ईशीत भट्ट या मुलाचं नाव असून तो पाचवीत शिकतो. दरम्यान केबीसीच्या शोमध्ये उत्तर सांगताना तो अमिताभ यांच्याशी अतिशय उद्धटपणे बोलत होता. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केलं. त्याच्यावर टीका करण्यात आली. परंतु आता वैभव मांगलेनं त्याची बाजू घेतलीय.