स्वामिंग पूल, हिरवीगार झाडं... वंदना गुप्तेंच्या अलिबागमधल्या बंगल्याची खास झलक; नाटकाच्या टीमचं केलं जंगी स्वागत

VANDANA GUPTE ALIBAUG BANGLOW: लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने नुकतीच मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांच्या अलिबागमधील बंगल्याची झलक दाखवलीय.
VANDANA GUPTE

VANDANA GUPTE 

ESAKAL 

Updated on

छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या लोकप्रिय मराठी अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाटक मालिका आणि चित्रपटातून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांच्या ‘पछाडलेला’, ‘बाईपण भारी देवा’, ‘टाइमप्लीज’, ‘बकेट लिस्ट’ यातील भूमिका चांगल्याच गाजल्या, त्यांचा भारदस्त आवाज आणि चेहऱ्यावरचे हावभाव यामुळे त्या कायमच प्रेक्षकांच्या आवडत्या ठरल्या. सध्या वंदना गुप्ते 'कुटुंब किर्रतन' या नाटकात काम करताना दिसतायत. नुकताच या नाटकाचा प्रयोग अलिबागमध्ये पार पडला. त्या निमित्ताने नाटकाची टीम वंदना यांच्या अलिबाग येथील बंगल्यावर गेली होती. अभिनेता संकर्षण कऱ्हाडे याने त्यांच्या बंगल्याची झलक दाखवली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com