पहिल्या पावसात खुलणार समर आणि स्वानंदीचं प्रेम! 'वीण दोघातली ही तुटेना'चा जबरदस्त प्रोमो समोर, नेटकरी म्हणतात, 'समरराव...'

VEEN DOGHATLI HI TUTENA NEW PROMO : 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेचा नवा प्रोमो समोर आलाय. यात समर आणि स्वानंदी पहिल्या पावसात भिजताना दिसतायत.
VEEN DOGHATLI HI TUTENA

VEEN DOGHATLI HI TUTENA

ESAKAL

Updated on

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' सध्या प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतेय. या मालिकेने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. सुरुवातीपासूनच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मात्र आता प्रेक्षकांचा या मालिकेतला इंटरेस्ट वाढताना दिसतोय. त्याचं कारण आहे या मालिकेचा ट्रॅक. सध्या 'वीण दोघातली ही तुटेना' मध्ये समर आणि स्वानंदी यांच्यातील प्रेम खुलताना दाखवण्यात येतंय. आता तर ते दोघे पहिल्या पावसात एकत्र भिजणार आहेत. नुकताच झी मराठीने मालिकेचा प्रोमो शेअर केलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com