
आमिर खानच्या थ्री इडियट चित्रपटात प्रोफेसरची भूमिका केलेले ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचं निधन झालं. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहे. पोतदार यांनी १२५ पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये, ९५ दूरदर्शन मालिका, २६ नाटके आणि ४५ जाहिरातींमध्ये अभिनय केला आहे.