Vicky Kaushal: डाएटला विसरुन विकीने मारला पाणीपुरीवर ताव; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Vicky Kaushal: सध्या सोशल मीडियावर विकीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्य्ये तो पाणीपुरी खाताना दिसत आहे.
Vicky Kaushal
Vicky Kaushalesakal

Vicky Kaushal: सगळ्या तरुणाईचा क्रश विकी कौशल (Vicky Kaushal) त्याच्या खव्वयेपणासाठीही प्रसिद्ध आहे. मनमौजी, मस्तमौला असलेला विकी त्याला संधी मिळताच त्याच्या आवडीच्या पदार्थांवर ताव मारताना अनेकदा पाहायला मिळतो. सध्या सोशल मीडियावर विकीचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यामध्य्ये तो पाणीपुरी खाताना दिसत आहे. नुकताच 'छावा' (Chhava) सिनेमाच्या सेटवर विकीने पाणीपुरीवर ताव मारला.

विकीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर नुकताच एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात 'छावा' सिनेमाच्या सेटवर शुटिंगमधून ब्रेक घेत विकी खाण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याला पाणीपुरी दिसली आणि कसलाही विचार न करता विकीने पाणीपुरी खायला सुरुवात केली. यावेळी विकी थोडा भावूकही झाला. पाणीपुरीसाठी विकीने चक्क त्याच्या डाएटला एका दिवसासाठी रामराम केला. त्याने या व्हिडिओला "खूप महिन्यांनी चीट मील. ती सुद्धा पाणीपुरी. मी आज रडणार आहे. अक्षय अरोरा आय लव्ह यु.. " असं कॅप्शन दिलं आहे. अक्षय अरोरा हा विकीचा मित्र असून तो त्याच्या डाएटची सुद्धा काळजी घेतो. त्याने विकीच्या चिट डेला दिलेलं सरप्राइज पाहून विकीसुद्धा खूप खुश झाला.

पाहा व्हिडीओ:

Vicky Kaushal
Vicky Kaushal : 'तो अभिनेता शेवटचा सुपरस्टार त्यानंतर कुणीही...'! विकी कौशलनं कुणाचं घेतलं नाव?

विकी सध्या लक्ष्मण उतेकर यांचं दिग्दर्शन असलेल्या 'छावा' या सिनेमात काम करतोय. या सिनेमात तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाई राणीसाहेबांच्या भूमिकेत दिसणार आहे. याच वर्षी हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हंटलं जातंय. याशिवाय तो बॅड न्यूज या सिनेमातही काम करतोय. या सिनेमात तो तृप्ती डिमरी, अॅमी विर्क यांच्यासोबत काम करतोय. १९ जुलै २०२४ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. तर या वर्षाच्या सुरुवातीला विकीचा सॅम बहादूर हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमात त्याने माजी लष्करप्रमुख सॅम माणेकशा यांच्या भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाने सगळ्यांचं मन जिंकलं तर या सिनेमाने सिनेमागृहात पन्नास आठवडे पूर्ण केले. मेघना गुलजार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com