Vicky Kaushal–Katrina Kaif Baby Photo Goes Viral
esakal
Katrina Kaif Baby Photo Viral : अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफ हे बॉलिवूड विश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. दोघांच्या आयुष्यात आता एका गोंडस बाळाचं आगमन झालय. 7 नोव्हेंबर रोजी कतरिनाने एका मुलाला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियावर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला. चाहते विकी आणि कतरिनाचं बाळ पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अशातच आता सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. बाळाच्या जन्मानंतर 13 दिवसांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.