VICKY KAUSHAL KATRINA KAIF SON VIHAAN
esakal
KATRINA KAIF REQUESTS PAPARAZZI NOT TO CLICK SON: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडते. गेल्या वर्षी दोघांना एक गोंडस मुलगा झाला. त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव विहान असं ठेवलं. सेलिब्रिटींचा मुलं कशी दिसत असतील याची उत्सुकता चाहत्यांना नेहमीच असते. त्यांच्या एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात. रणबीर कपूर आणि आलिया भट्टची लेक राहा, रणवीर आणि दीपिकाची लेक दुवा, करीना कपूर सैफ अली खानचा मुलगा तैमुर यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. दरम्यान अशातच आता कतरिना आणि विकी कौशल यांनी त्यांचा मुलांचा चेहरा पापाराझींना दाखवला आहे. यावेळी दोघांनी पापाराझींजवळ खास विनंती सुद्धा केली आहे.