
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये अनेक क्लासिक सिनेमांची निर्मिती झाली आहे.यातीलच एक गाजलेला सिनेमा म्हणजे परिंदा. विधू विनोद चोप्रा यांचं दिग्दर्शन असलेल्या सिनेमात नाना पाटेकर, अनिल कपूर आणि जॅकी श्रॉफ यांची मुख्य भूमिका होती. पण तुम्हाला माहितीये का ? या सिनेमाच्या सेटवर नाना आणि विधू विनोद चोप्रा यांच्यात जोरदार भांडण आणि मारामारी झाली होती.