लेकीने जीव दिला, अभिनेत्याच्या जिव्हारी लागलं, ३ वर्षांपासून बिना चपलेचा फिरतो, पत्नी म्हणते- तिने शेवटचं जे घड्याळ घातलेलं...

Vijay Antony Daughter Death And Emotional Story | Wife Reveals Memory Of Daughter's Last Wristwatch: अभिनेत्याच्या मोठ्या लेकीच्या निधनानंतर त्याने चप्पल किंवा शूज घालणं सोडून दिलं. तिने निधनावेळी जे घड्याळ घातलेलं ते अभिनेत्याने...
vijay antony

vijay antony

esakal

Updated on: 

आपल्या मुलांचं निधन आपल्या डोळ्यासमोर पाहणं हा कोणत्याही आईवडिलांसाठी अत्यंत वाईट प्रसंग असतो. ज्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो ते असे आपल्याला कायमचे सोडून जाताना पाहणं आईवडिलांसाठी मुळीच सोपं नसतं. असंच दाक्षिणात्य अभिनेता विजय अँटनी याने आपल्या १६ वर्षीय मुलीला गमावलं. सप्टेंबर २०२३ मध्ये विजय अँटनीची मोठी मुलगी मीरा हिने राहत्या घरात आत्महत्या करत स्वतःला संपवलेलं. त्याने अभिनेत्याला मोठा धक्का बसला होता. अजूनही तो या धक्क्यातून सावरलेला नाही. लेकीच्या निधनानंतर त्याने एक भावुक निर्णय देखील घेतला. विजयची पत्नी फातिमा हिने त्याच्या आगामी चित्रपटाच्या प्रीमिअरमध्ये याबद्दल सांगितलंय.

Loading content, please wait...