

Vijay Sethupathi at 54th International Emmy Awards
esakal
Vijay Sethupathi: न्यूयॉर्क शहरातील 'न्यूयॉर्क हिल्टन मिडटाऊन' येथे पार पडलेल्या 54 व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार सोहळ्यात तमिळ अभिनेता विजय सेतुपती प्रेझेंटरच्या भूमिकेत दिसला. भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी आणि न्यूयॉर्कमध्ये सोमवारी संध्याकाळी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. अभिनेता मायकेल युरी याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
ANI ने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात 16 श्रेणींमध्ये एकूण 64 नामांकने होती. विजय सेतुपतीसोबत कॉन्स्टन्स झिमर, सेलिया इम्री, जे फॅरो, गस केनवर्थी, सोफी शार्लोट, रॉबी जीके आणि डेव्हिड झॅस्लॉव्ह यांसारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचाही प्रेझेंटरच्या यादीत समावेश होता.