

Took a vow visiting Tirupati at the age of 23.
Sakal
बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी गेल्या तीन दशकांपासून आपल्या सिग्नेचर 'बाल्ड लूक'साठी (टक्कल) ओळखला जातो. मात्र, वयाच्या २३ व्या वर्षापर्यंत विशालचे केस खूप लांब आणि दाट होते. नेहा धुपिया आणि अंगद बेदी यांच्या 'डबल डेट' (Double Date) या यूट्यूब शोमध्ये श्रुती हासनसोबत हजेरी लावली असता, विशालने वयाच्या २३ व्या वर्षी टक्कल का केले आणि पुन्हा कधीच केस का वाढवले नाहीत, यामागचा रंजक किस्सा सांगितला.