Vivek Oberoi Says People May Forget Shah Rukh Khan by 2050
esakal
अभिनेता विवेक ओबेरॉय याचा 'मस्ती 4' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 नोव्हेंबर म्हणजे उद्या हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सध्या विवेक ओबेरॉय या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमामध्ये विवेकसह रितेश देशमुख, आफताब शिवदासानी सारखे कलाकार पहायला मिळणार आहे. दरम्यान अशातच एका मुलाखतीत विवेक ओबेरॉयने सुपरस्टार शाहरुख खानबद्दल एक भाष्य केलंय. तो म्हणाला की, '२०५० पर्यंत शाहरुखला लोकं विसरुन जातील.'