कर्करोगग्रस्त चिमुकल्यांसाठी विवेक ओबेरॉयचा खास उपक्रम; 'रामायणम्'चं ठेवलं विशेष स्क्रीनिंग

VIVEK OBEROI BRINGS SMILES TO CHILDREN BATTLING CANCER:अभिनेता विवेक ओबेरॉयने कर्करोगाशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांसाठी 'रामायणम्'चं विशेष स्क्रीनिंग आयोजित केलं. त्याच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
VIVEK OBEROI

VIVEK OBEROI

esakal

Updated on: 

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय सध्या त्याच्या आगामी पौराणिक चित्रपट 'रामायणम्'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याने विद्युतजिह्व ही भूमिका साकारली आहे. मात्र, यावेळी विवेक त्याच्या अभिनयामुळे नाही, तर एका खास सामाजिक उपक्रमामुळे चर्चेत आलाय. विवेकने कॅन्सरशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी 'रामायणम्' सिनेमाचं विशेष स्क्रीनिंग आयोजित केली होती. त्याच्या या उपक्रमाचं सोशल मीडियावर कौतूक होतय.

Loading content, please wait...