

Bollywood News : बॉलिवूडमधील एक एव्हरग्रीन जोडी म्हणजे धर्मेंद्र आणि हेमामालिनी. पण धर्मेंद्र यांचं हे दुसरं लग्न आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. यांचं लग्न कुटूंबाच्या मर्जीविरोधात आणि बऱ्याच वाद-विवादानंतर झालं होतं. हेमामालिनी यांच्या कुटूंबातून विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांकडून या लग्नाला विरोध होता. इतकंच नाही तर हेमा यांच्या वडिलांनी त्यांचं लग्न दुसऱ्याच अभिनेत्याशी करून द्यायचं ठरवलं होतं.