
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध ज्येष्ठ गायक उदित नारायण किसिंग कॉंट्रोव्हर्सीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांची गाणी जरी प्रसिद्ध असली तरीही त्यांच्याविषयीचे अनेक किस्सेही इंडस्ट्रीमध्ये गाजले आहेत. त्यातच आता भर कॉन्सर्टमध्ये एका चाहतीला लीप टू लीप किस केल्यामुळे त्यांच्यावर टीका होतेय. सोशल मीडियावर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यातच त्यांचा मुलगा आदित्यचाही जुना वाद पुन्हा उफाळून वर आला आहे.