

abhishek bachchan on raja shivaji mandhan
ESAKAL
रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकतोय. यात रितेश स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय. तर जिनिलिया देशमुख महाराणी सईबाईंची भूमिका साकारतेय. भाग्यश्री राजमाता जिजाऊ यांची भूमिका साकारतेय तर अभिनेता अभिषेक बच्चन हा शहाजी राजेंचे भाऊ संभाजी राजे यांची भूमिका साकारलीये. मात्र या भूमिकेसाठी अभिषेकने एक रुपयाही मानधन घेतलेलं नाही. त्याबद्दल सोशल मीडियावर अनेक उलट सुलट चर्चा सुरू आहेत. आता अखेर अभिषेकने या चर्चांना पूर्णविराम लावत मानधन न घेण्याचं खरं कारण सांगितलंय.