
सध्याच्या काळात लग्नाच्या बाबतीत सगळ्यांचे विचार बदलले आहेत. आजची पिढी लग्नाच्या नावानेच दूर पळताना दिसतेय. त्यातही अनेक अभिनेत्री आजकाल एकट्या राहताना दिसतायत. आधीच्या नात्यांमधून आलेल्या अनुभवामुळे हे कलाकार एकट्याने आयुष्य घालवणं पसंत करतात. अशीच एक मराठी अभिनेत्री जी लग्न करण्यासाठी स्पष्ट नकार देतेय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचं लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.